Sunday, August 9, 2009

श्री
नव्या वाटांवरील नवी दालने दाखवतात
नव्या प्रतिमा,ज्या असतात नव्या खुणा
नवे संकेत ध्वनिचित्रशब्दांच्या रुपाने
अभिव्यक्त होणा~या नवसृष्टीची विभिन्न रुपे
सर्वांना मोहीत करणारी
रोज नवा आनंद देणारी!
॥श्री॥
संस्कारमुक्त चेतना शुद्ध प्रज्ञेच्या रुपाने
देत असते प्रेरणा
विश्वसंवाद साधण्याची
जो असतो आधार दिवसरात्र येणा~या सात्त्विक अनुभवांचा
त्यांची आठवण साठवित त्यांच्याशी
सदैव संयुक्त असणारे मनच
बुद्धीद्वारा निर्मित असते
स्वस्थ ,सुंदर,मनोहर
अशी विहंगम सृष्टी
तुम्हां,आम्हां सर्वांना आनंदीत ठेवण्यासाठी!
॥श्री॥
जीवनदायिनीची जीवनगाथा
जाणणारा शहाणा मानव
जगण्यावरती
प्रेम करीत
जोडतो माणसांना
विवेकी रसिकांशी संवाद साधत
सांगतो शुद्ध मंत्र आरोग्याचा
जो सिद्ध होताच
तृप्त होतात सारेच
नित्यप्राप्त आनंदाने!
श्री
हमारी वर्तमान स्थिती के यथास्थित ज्ञान के साथ
शिक्षाके प्रभावसे
निरंतर सेवा का लाभ उठाते हुए
होता हॆ
प्राकृतिक गुणसंवर्धन
जिसके द्वारा हो जाती हॆ
समष्टिसाधना सहजरुपसे!
बरसती हॆ गुरुकृपा ज्ञानधारा बनकर
जो बन जाती हॆ आधार सारे जीवनका!
जीवन का हर पल बन जाती हॆ अनुभूति
नित्यशुद्ध परमेश्वर के अस्तित्वकी.......
जो नित नयी सृष्टी बनाता,सजाता तथा सवांरता हॆ
हम सब जीवों के लिए!
उसकी असीम कृपा से प्रेरित
हर सांस बन जाती हॆ सहज प्राणायाम!
जो निरंतर हमें दीर्घायु , आरोग्य तथा ऎश्वर्य
प्रदान करती हॆ!
गुरुकृपाका यह आत्मप्रेरित (स्वयंप्रेरित) अभ्यास ही
बन जाती हॆ व्यष्टिसाधना जिसके लिए
किसी और साधन की आवश्यकता नही होती।
श्री.ग.अग्निहोत्री
(स्वानंदार्थ)
॥श्री॥
हे सूर्या
तुझ्या सवितेच्या स्पर्शाने पुलकित होऊन
स्वप्रकाशाने तूच प्रकाशित केलेले
विश्वच असते सनातन अर्थात नित्य नुतन
स्वकिरणांनी सभोवतालचे पर्यावरण
प्रफ़ुल्लीत करणारा तूच आहेस
निर्माता,खरा भाग्यविधाता ह्या तुझ्या विश्वाचा
तू विहरत असतोस सदैव
कधी पुर्वेकडून पश्चिमेकडे
तर कधी पश्चिमेकडून पुर्वेकडे
तुझे नित्य भ्रमणच
निर्माण करीत असते
अखंड अक्षय्य ऊर्जा!
जी सर्वांनाच हवी असते
आपले अस्तित्व टिकविण्यासाठी!
निर्मितीबरोबरच तू ती वितरीतही करित असतोस
कधीही न थकता सुरु असणारा
तुझा नित्य प्रवासच असतो प्रयोजन
तुझ्या भ्रमणाचे!
प्रगतिच्या दिशेने होणारी
विज्ञानाची वाटचालच
निर्मित असते पाया
नव्या विश्वाचा
ज्ञानाचे नवे आयाम सांगत
दिक्कालाची नवी मांडणी करीत
ज्य़ातून साकारतात
नव्या सकारात्मक घटना
ज्या ठरतात नांदी
शांत,सशक्त,समर्थ,संपन्न, सुखी
आनंदमय जीवनाच्या !
ज्यासाठीच झटत असतात सारेच
आयुष्यभर अविरत
त्यातीलच हाही एक प्रयत्न
ज्ञानविज्ञानाची उपयुक्तता जाणून घेण्याचा
ती नव्या माध्यमातून सांगण्याचा !
विज्ञानाधिष्ठीत संगणकीय प्रणालीने
जोड्ले जातेय जग एका अनोख्या पद्धतिने
ज्याचे धागेदोरे गुंफ़णारे असतात असंख्य हात!
अदृश्य अवकाशाच्या माध्यमाद्वारे जुळ्लेली मने
निर्माण करतात नवे बौद्धिक विश्व!
स्थलकालाच्या सीमांचे उल्लंघन करीत
ते मिळवत असतात विजय समस्यांवर
वेळीच मात करुन!
इथेच प्रत्येक क्षण बनतो उत्सव
जो साजरा करण्यासाठी सारेच असतात तत्पर
आनंदाने!