Sunday, August 9, 2009

श्री
नव्या वाटांवरील नवी दालने दाखवतात
नव्या प्रतिमा,ज्या असतात नव्या खुणा
नवे संकेत ध्वनिचित्रशब्दांच्या रुपाने
अभिव्यक्त होणा~या नवसृष्टीची विभिन्न रुपे
सर्वांना मोहीत करणारी
रोज नवा आनंद देणारी!
॥श्री॥
संस्कारमुक्त चेतना शुद्ध प्रज्ञेच्या रुपाने
देत असते प्रेरणा
विश्वसंवाद साधण्याची
जो असतो आधार दिवसरात्र येणा~या सात्त्विक अनुभवांचा
त्यांची आठवण साठवित त्यांच्याशी
सदैव संयुक्त असणारे मनच
बुद्धीद्वारा निर्मित असते
स्वस्थ ,सुंदर,मनोहर
अशी विहंगम सृष्टी
तुम्हां,आम्हां सर्वांना आनंदीत ठेवण्यासाठी!
॥श्री॥
जीवनदायिनीची जीवनगाथा
जाणणारा शहाणा मानव
जगण्यावरती
प्रेम करीत
जोडतो माणसांना
विवेकी रसिकांशी संवाद साधत
सांगतो शुद्ध मंत्र आरोग्याचा
जो सिद्ध होताच
तृप्त होतात सारेच
नित्यप्राप्त आनंदाने!
श्री
हमारी वर्तमान स्थिती के यथास्थित ज्ञान के साथ
शिक्षाके प्रभावसे
निरंतर सेवा का लाभ उठाते हुए
होता हॆ
प्राकृतिक गुणसंवर्धन
जिसके द्वारा हो जाती हॆ
समष्टिसाधना सहजरुपसे!
बरसती हॆ गुरुकृपा ज्ञानधारा बनकर
जो बन जाती हॆ आधार सारे जीवनका!
जीवन का हर पल बन जाती हॆ अनुभूति
नित्यशुद्ध परमेश्वर के अस्तित्वकी.......
जो नित नयी सृष्टी बनाता,सजाता तथा सवांरता हॆ
हम सब जीवों के लिए!
उसकी असीम कृपा से प्रेरित
हर सांस बन जाती हॆ सहज प्राणायाम!
जो निरंतर हमें दीर्घायु , आरोग्य तथा ऎश्वर्य
प्रदान करती हॆ!
गुरुकृपाका यह आत्मप्रेरित (स्वयंप्रेरित) अभ्यास ही
बन जाती हॆ व्यष्टिसाधना जिसके लिए
किसी और साधन की आवश्यकता नही होती।
श्री.ग.अग्निहोत्री
(स्वानंदार्थ)
॥श्री॥
हे सूर्या
तुझ्या सवितेच्या स्पर्शाने पुलकित होऊन
स्वप्रकाशाने तूच प्रकाशित केलेले
विश्वच असते सनातन अर्थात नित्य नुतन
स्वकिरणांनी सभोवतालचे पर्यावरण
प्रफ़ुल्लीत करणारा तूच आहेस
निर्माता,खरा भाग्यविधाता ह्या तुझ्या विश्वाचा
तू विहरत असतोस सदैव
कधी पुर्वेकडून पश्चिमेकडे
तर कधी पश्चिमेकडून पुर्वेकडे
तुझे नित्य भ्रमणच
निर्माण करीत असते
अखंड अक्षय्य ऊर्जा!
जी सर्वांनाच हवी असते
आपले अस्तित्व टिकविण्यासाठी!
निर्मितीबरोबरच तू ती वितरीतही करित असतोस
कधीही न थकता सुरु असणारा
तुझा नित्य प्रवासच असतो प्रयोजन
तुझ्या भ्रमणाचे!
प्रगतिच्या दिशेने होणारी
विज्ञानाची वाटचालच
निर्मित असते पाया
नव्या विश्वाचा
ज्ञानाचे नवे आयाम सांगत
दिक्कालाची नवी मांडणी करीत
ज्य़ातून साकारतात
नव्या सकारात्मक घटना
ज्या ठरतात नांदी
शांत,सशक्त,समर्थ,संपन्न, सुखी
आनंदमय जीवनाच्या !
ज्यासाठीच झटत असतात सारेच
आयुष्यभर अविरत
त्यातीलच हाही एक प्रयत्न
ज्ञानविज्ञानाची उपयुक्तता जाणून घेण्याचा
ती नव्या माध्यमातून सांगण्याचा !
विज्ञानाधिष्ठीत संगणकीय प्रणालीने
जोड्ले जातेय जग एका अनोख्या पद्धतिने
ज्याचे धागेदोरे गुंफ़णारे असतात असंख्य हात!
अदृश्य अवकाशाच्या माध्यमाद्वारे जुळ्लेली मने
निर्माण करतात नवे बौद्धिक विश्व!
स्थलकालाच्या सीमांचे उल्लंघन करीत
ते मिळवत असतात विजय समस्यांवर
वेळीच मात करुन!
इथेच प्रत्येक क्षण बनतो उत्सव
जो साजरा करण्यासाठी सारेच असतात तत्पर
आनंदाने!
श्री
पवन ऊर्जेच्या योगाने,
सूर्य चन्द्रासहित सा~याच आसमंताचे
आणि पृथ्वीवासियांचे
आरोग्य,ऎश्वर्य अबाधित ठेवण्याची
किमया साधत
सुखाच्या सुपरहायवेवर स्वार होऊन
शतायुषी सशक्त,समर्थ जीवन जगलेल्यांच्या
शुभाशिर्वादाने
प्रस्फ़ुरित होणारी आनंदस्पंदने
कवनांच्या रुपाने साकार होतात!
शिव-शक्तिच्या शब्दार्थरुप प्रत्ययाचे भान
स्वर-संगिताच्या माध्यमाने बेभान करतात
तिथेच प्रगटते नित्यशुध्द,स्वस्थ,सशक्त,संपंन्न
स्वत:सिद्ध स्वरुप
स्वानंदरुपाने! श्री.ग.अग्निहोत्री
॥श्री॥
अनोख्या वाटेवर
तिच्या आकाशासोबत
माझं मौन
गुफ़्तगू करीत
वावरतं
तेंव्हा होते मेघवर्षा
आणि
छंदात रंगते कविता
अक्षरलेणी बनून
घालते गीतमोहीनी
तिथंच बहरतो
एकुणच माणसांचा प्रदेश
आनंदाने!
त्याचीच ही अभिव्यक्ति
वैयक्तिक अनुभवापलिकडे जाणारी
म्हणुनच सर्वांनाच भारून टाकणारी!
श्री.ग.अग्निहोत्री.
॥श्री॥
मौनसंवादातून फ़ुलत असते अन्तर्जाणीव
जी असते स्वाभाविक प्रेरणा
स्वायत्त कर्माची
ज्यातून दृढ होतो आत्मविश्वास
आणि वाढत जाते आत्मबल
ज्याद्वारा मिळत असतो आत्मसम्मान
जो आवश्यक असतो
शान्त ,सुखी आणि समाधानकारक
वैयक्तिक आणि सामाजिक जीवन जगण्यासाठी
स्वजनांना आपलेसे करण्यासाठी!
॥श्री॥
अलिकडे ब्रह्मविद्येने प्रेरित
शुद्धोल्लासाचे क्षण येतात
जे देतात शुद्धोत्साह
जगण्याचा
जीवनच असते मूळ स्त्रोत
आनंदाचा
शांतिचा ,सुखाचा,समाधानाचा!
कदाचित यासाठीच प्रतिक्षा करीत सारेच
असतात सर्व येणा~या चैतन्यस्वरुपी
आरोग्यवान दीर्घायुषी बालकांची
जागरुक पालक बनून !
आकाशातुन येणा~या शांत शीतल वायुलहरी
निर्माण करतात अनोखे वातावरण
मधुर संवादाचे,गेय गीतांचे,सुस्वर संगिताचे
हलक्याफ़ुलक्या विनोदांचे
जीवन हसरे बनविणारे हे क्षण
मनात ,ह्रदयात,बुद्धित साठवून
वृद्धींगत करावयाचा असतो आनंद
जो नेहमीच नित्यप्राप्त असतो
त्याचीच ही शब्दाभिव्यक्ती
जाणत्या रसिकांसाठी
सिद्ध मेजवानी म्हणून!
॥श्री॥
अभ्युदयासाठी गरूडझेप
घेणा~यांवर लक्ष्मी
सदैव असते प्रसन्न!
सरस्वतीही बुद्धी कुशाग्र ठेवीत
दाखवित असते नव्या वाटा
ज्ञानविज्ञानाच्या आदानप्रदानाच्या
नवनव्या माध्यमातून!
मातृरुपाने प्रतिष्ठीत असण्या~या
ह्या दैवतांच्या कृपाशिर्वादानेच
लाभते जीवनशक्ती
जी ठेवते सर्वांना चिरतरुण
तनाने-मनाने-बुद्धीने
आणि करते त्यांना
संपन्न,समृद्ध,श्रीमंत
त्यांच्या प्रयत्नांना दैवाची साथ देत!
अक्षरांच्या ध्यासात
शब्दांची निर्दोष जुळणी करताच
साकारतात ऊर्जाक्षरं
जी निर्माण करतात
सा~य़ा भौतिक सुविधा
स्वतःला आवश्यक असलेल्या
अंतरंगातील समाधान कायम ठेवीत
जी असते खरी ऊर्जा
तन-मन-बुद्धीला ताजेतवाने करणारी
एक अमूल्य ठेव
वाड्वडिलांकडून
आशिर्वादरुपाने लाभलेली
स्वतःच फ़लीत होणारी
आपलीच पुर्वपुण्याई म्हणून!
श्री
ज्ञानाच्या अथांग सागरात,विहार करतांना
शोधावे लागतात किनारे ....
विसाव्यासाठी!
किनारे आहेत म्हणूनच
कितीही खोल डुबक्या लावल्या तरी
आपण येऊ शकतो वर केंव्हाही
शोधु शकतो नवनवे शिंपले आणि मोती
सूत्र आणि सिद्धांतरुपाने!
सोपवू शकतो ते नव्या पिढीला संवादरुपाने!
संवादरुपी नौकेनेच जोडले जातात किनारे
सापडतात रोज नव्या वाटा
ज्यांचा आधारे सुरु ठेवायचा असतो जीवनप्रवास
एक सहज प्रयास म्हणून!
श्री.ग.अग्निहोत्री.
॥श्री॥
सात्त्विक संस्कारयुक्त चेतनेचा
उपयोग करीत
व्यतित होणारे शांत ,संयत जीवन
नेहमीच असते आरोग्य आणि ऎश्वर्यसंपन्न!
ते टिकविण्यासाठीच
करावयाची असते साधना आणि आराधना
नित्यशुद्धबुद्धमुक्त अशा परमेश्वराची
जो नेहमीच साथ देत असतो भक्तांना
आपल्या नित्यविद्यमान सात्त्विक
शक्तिच्या माध्यमातुन
सदगुणांची अभिवृद्धी करीत!
क्रियायोगाद्वारा प्रक्षेपित शुद्ध स्पंदने
संचालित करतात ज्ञानेच्छाकृतिंना
शुभसंकल्प पूर्ण करण्यासाठी!
सहजयोगाचा नित्याभ्यास
स्वच्छ करतो अन्तरीक्ष
तन-मन-बुद्धीला शांत,सशक्त,समर्थ श्रीमंत आणि प्रसन्न
पर्यावरण निर्मित!
॥श्री॥
अक्षरयोगाच्या माध्यमातून
शब्दांकित होणारे इतिवृत्त
करत असते प्रवृत्त
जीवनप्रवास करण्यास
नित्यगतिशील सुर्याच्या तेजस्वी किरणांसोबत!
त्यातूनच फ़ुलते नवे भावविश्व
नवतरुणांच्या सोबतीने
रचले जाणारे नवे संसारस्वप्न!
झोपेतही जागवणारे
सुखद क्षणच असतात स्वप्ने
जी पूर्ण करावयाची असतात
सर्वांच्या ज्ञानेच्छाकृतिच्या समन्वयातुन!
जेष्ठ,श्रेष्ठांच्या शुभाशिर्वादाद्वारे
सहज लाभण्या~या आत्मशक्तिच्या
सबल ,समर्थ,अभिव्यक्तितुन!
त्यातुन होणारा प्रकृतिसंवादच
ठेवत असतो सारेच पर्यावरण
सुरक्षित,संतुलित .....
स्वतःचे आणि सर्व स्वजनांचे
स्वास्थ्य उत्तम राखत
"आरोग्यं धनसंपदा"
हि नित्यप्रार्थना सफ़ल करीत!

Sunday, August 2, 2009

Revealing the blog world

This is my first attempt to write on the blog.Letters, images ,slides,sounds and videos which constitute modes of human communications seem to be the things that make a blog.Expressing our abstract experiences in a way to make others understand it has always been the root of all human activities since the begining of the world we live in.This has resulted in formation of sculpures,paintings,writings ,plays ,movies and so on.These enables us all to understand our ancestors and also make ourselves understandable to forthcoming generations.Having experienced blogs created by others has motivated me create one more for those who like are interested in reveaing the blog world.