श्री
ज्ञानाच्या अथांग सागरात,विहार करतांना
शोधावे लागतात किनारे ....
विसाव्यासाठी!
किनारे आहेत म्हणूनच
कितीही खोल डुबक्या लावल्या तरी
आपण येऊ शकतो वर केंव्हाही
शोधु शकतो नवनवे शिंपले आणि मोती
सूत्र आणि सिद्धांतरुपाने!
सोपवू शकतो ते नव्या पिढीला संवादरुपाने!
संवादरुपी नौकेनेच जोडले जातात किनारे
सापडतात रोज नव्या वाटा
ज्यांचा आधारे सुरु ठेवायचा असतो जीवनप्रवास
एक सहज प्रयास म्हणून!
श्री.ग.अग्निहोत्री.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment