Sunday, August 9, 2009

अक्षरांच्या ध्यासात
शब्दांची निर्दोष जुळणी करताच
साकारतात ऊर्जाक्षरं
जी निर्माण करतात
सा~य़ा भौतिक सुविधा
स्वतःला आवश्यक असलेल्या
अंतरंगातील समाधान कायम ठेवीत
जी असते खरी ऊर्जा
तन-मन-बुद्धीला ताजेतवाने करणारी
एक अमूल्य ठेव
वाड्वडिलांकडून
आशिर्वादरुपाने लाभलेली
स्वतःच फ़लीत होणारी
आपलीच पुर्वपुण्याई म्हणून!

No comments:

Post a Comment