Sunday, August 9, 2009

श्री
पवन ऊर्जेच्या योगाने,
सूर्य चन्द्रासहित सा~याच आसमंताचे
आणि पृथ्वीवासियांचे
आरोग्य,ऎश्वर्य अबाधित ठेवण्याची
किमया साधत
सुखाच्या सुपरहायवेवर स्वार होऊन
शतायुषी सशक्त,समर्थ जीवन जगलेल्यांच्या
शुभाशिर्वादाने
प्रस्फ़ुरित होणारी आनंदस्पंदने
कवनांच्या रुपाने साकार होतात!
शिव-शक्तिच्या शब्दार्थरुप प्रत्ययाचे भान
स्वर-संगिताच्या माध्यमाने बेभान करतात
तिथेच प्रगटते नित्यशुध्द,स्वस्थ,सशक्त,संपंन्न
स्वत:सिद्ध स्वरुप
स्वानंदरुपाने! श्री.ग.अग्निहोत्री

No comments:

Post a Comment