॥श्री॥
अक्षरयोगाच्या माध्यमातून
शब्दांकित होणारे इतिवृत्त
करत असते प्रवृत्त
जीवनप्रवास करण्यास
नित्यगतिशील सुर्याच्या तेजस्वी किरणांसोबत!
त्यातूनच फ़ुलते नवे भावविश्व
नवतरुणांच्या सोबतीने
रचले जाणारे नवे संसारस्वप्न!
झोपेतही जागवणारे
सुखद क्षणच असतात स्वप्ने
जी पूर्ण करावयाची असतात
सर्वांच्या ज्ञानेच्छाकृतिच्या समन्वयातुन!
जेष्ठ,श्रेष्ठांच्या शुभाशिर्वादाद्वारे
सहज लाभण्या~या आत्मशक्तिच्या
सबल ,समर्थ,अभिव्यक्तितुन!
त्यातुन होणारा प्रकृतिसंवादच
ठेवत असतो सारेच पर्यावरण
सुरक्षित,संतुलित .....
स्वतःचे आणि सर्व स्वजनांचे
स्वास्थ्य उत्तम राखत
"आरोग्यं धनसंपदा"
हि नित्यप्रार्थना सफ़ल करीत!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment