Sunday, August 9, 2009

॥श्री॥
सात्त्विक संस्कारयुक्त चेतनेचा
उपयोग करीत
व्यतित होणारे शांत ,संयत जीवन
नेहमीच असते आरोग्य आणि ऎश्वर्यसंपन्न!
ते टिकविण्यासाठीच
करावयाची असते साधना आणि आराधना
नित्यशुद्धबुद्धमुक्त अशा परमेश्वराची
जो नेहमीच साथ देत असतो भक्तांना
आपल्या नित्यविद्यमान सात्त्विक
शक्तिच्या माध्यमातुन
सदगुणांची अभिवृद्धी करीत!
क्रियायोगाद्वारा प्रक्षेपित शुद्ध स्पंदने
संचालित करतात ज्ञानेच्छाकृतिंना
शुभसंकल्प पूर्ण करण्यासाठी!
सहजयोगाचा नित्याभ्यास
स्वच्छ करतो अन्तरीक्ष
तन-मन-बुद्धीला शांत,सशक्त,समर्थ श्रीमंत आणि प्रसन्न
पर्यावरण निर्मित!

No comments:

Post a Comment