Sunday, August 9, 2009

॥श्री॥
अनोख्या वाटेवर
तिच्या आकाशासोबत
माझं मौन
गुफ़्तगू करीत
वावरतं
तेंव्हा होते मेघवर्षा
आणि
छंदात रंगते कविता
अक्षरलेणी बनून
घालते गीतमोहीनी
तिथंच बहरतो
एकुणच माणसांचा प्रदेश
आनंदाने!
त्याचीच ही अभिव्यक्ति
वैयक्तिक अनुभवापलिकडे जाणारी
म्हणुनच सर्वांनाच भारून टाकणारी!
श्री.ग.अग्निहोत्री.

No comments:

Post a Comment