॥श्री॥
हे सूर्या
तुझ्या सवितेच्या स्पर्शाने पुलकित होऊन
स्वप्रकाशाने तूच प्रकाशित केलेले
विश्वच असते सनातन अर्थात नित्य नुतन
स्वकिरणांनी सभोवतालचे पर्यावरण
प्रफ़ुल्लीत करणारा तूच आहेस
निर्माता,खरा भाग्यविधाता ह्या तुझ्या विश्वाचा
तू विहरत असतोस सदैव
कधी पुर्वेकडून पश्चिमेकडे
तर कधी पश्चिमेकडून पुर्वेकडे
तुझे नित्य भ्रमणच
निर्माण करीत असते
अखंड अक्षय्य ऊर्जा!
जी सर्वांनाच हवी असते
आपले अस्तित्व टिकविण्यासाठी!
निर्मितीबरोबरच तू ती वितरीतही करित असतोस
कधीही न थकता सुरु असणारा
तुझा नित्य प्रवासच असतो प्रयोजन
तुझ्या भ्रमणाचे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment